मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणजे लोकल. या लोकलबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हिडीओ पाहायला मिळतात. सकाळच्या वेळी ऑफिसला जाण्याची घाई असते आणि संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतताना लोकलमध्ये तुफान गर्दी असते. अशा वेळी नागरिकांना गर्दीतून प्रवास करावा लागतो. असाच गर्दीच्या वेळेचा बोरिवली स्थानकावरील गुरुवारी सकाळी 8:30 च्या सुमारास घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
…अन् महिला प्रवासीला मिळाली VIP ट्रीटमेंट
मुंबईकरांच्या सेवेत असलेली एसी लोकलची संख्या कमी आहे. त्यामुळे गर्दी वाढते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला एसी लोकलमध्ये चढली. पण गर्दीमुळे तिला फूटबोर्डवर लटकून उभे राहावे लागले. आता दरवाजे लागेल नाहीत तर ट्रेन पुढे जाणार नाही, मग काय, महिलेने ट्रेनमधून उतरण्यास नकार दिला. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे कर्मचारी आले तरी ती महिला कोणाला ऐकत नव्हती. अखेर ट्रेन गार्डने तिला समजवण्यासाठी पुढाकार घेतला. अखेर या महिला प्रवासीला VIP ट्रीटमेंट देण्यात आली. या महिलेला मोटरमनने केबिनमध्ये बसून प्रवास करण्याची विनंती केली. त्यानंतर महिला प्रवाशी खाली उतरली आणि थेट मोटारमन केबिनमध्ये गेल्या व तिथे बसून प्रवास केला. अखेर लोकल ट्रेन सुटली.
Join Our WhatsApp Community#ViralVideo : …अन् चक्क महिलेने केला मोटरमनच्या केबिनमध्ये बसून प्रवास#viralvideo #Train #Railway #RailwayStation #ACLocal #AcTrain #Railwayplatform #Viral #trains pic.twitter.com/WxqmoTfLT8
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) December 3, 2022