मुंबईतील विविध रुग्णालयांमधील शवगृह तसेच शव विच्छेदन केंद्र ही राज्य शासनाच्या अखत्यारित येत असून याची दुरुस्ती मुंबई जिल्हा खनिज फाऊंडेशनच्या माध्यमातून केली जाते. याबाबत मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर यासाठीचा निधी उपलब्ध करून देण्याची हमी या कार्यालयाने दिल्यानंतर महापालिकेने उपनगरातील ४ शव विच्छेदन केंद्रांची दुरुस्ती व ४ शवागृहांच्या नुतनीकरणाची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्राच्या दुरुस्तीचे काम आता लवकरच केले जाणार आहे.
( हेही वाचा : आमदार राजन साळवींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नोटीस
कोविड १९च्या दुसऱ्या लाटेमुळे स २०२०-२१मध्ये मृत्यूची संख्या बऱ्याच प्रमाणात वाढली गेली होती. याचा अतिरिक्त भार शवविच्छेदन आणि शवागृहांवर पडला होता. त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी तत्कालिन महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी मुंबई जिल्हा खनिज फाऊंडेशनच्या कार्यालयाकउे मुंबईतील विविध रुग्णालयांमधील महाराष्ट्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शवागृह व शवविच्छेदन केंद्राच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. या अनुषंगाने मुंबई उपनगरीय खनिज या विभागाने आरोग्य व स्वच्छता या याबाबीतंर्गत मान्यता दिली. फाऊंडेशन रेग्युलेटरी कौन्सि २०२१-२२च्या अर्थसंकल्पीय वर्षात पंतप्रधान खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यात मुंबई उपनगर जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या ४ शवविच्छेदन केंद्र व ४ शवागृहांच्या नुतनीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची हमी दिली. त्यात कुपर रुग्णालयातील शव विच्छेदन केंद्राच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यासह इतर रुग्णालयांमधील शव विच्छेदन केंद्र आणि शवागृहांच्या दुरुस्ती व नुतनीकरणाचे काम महापालिकेच्या नियोजन विभागाच्या मदतीने प्रत्येक रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्या माध्यमातून केले जाणार आहे.
कुपर रुग्णालयातील शवविच्छेन केंद्राच्या दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेच्यावतीने विविध करांसह १ कोटी ९२ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. या कामासाठी विधिटेक कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community