PMPML अर्थात पुणे महानगर परिवहन मंडळ लिमिटेडने प्रवाशांसाठी विशेष निर्णय घेतला आहे. सध्या पुणे शहराला भेट देणाऱ्या पर्यटकांना आणि पुणेकरांना प्रेक्षणीय स्थळांची सफर घडवणाऱ्या ‘पुणे दर्शन’ सेवेत क्यूआर कोडद्वारे तिकीट शुल्क आकारण्यास सुरूवात करण्यात आली आहे. पुणे दर्शन सेवेचा प्रयोग यशस्वी झाल्यास लवकरच पीएमपीच्या सर्व बसमध्ये या क्यूआर कोडद्वारे तिकीट स्कॅन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.
( हेही वाचा : नागपूरमध्ये चॉकलेट खाल्ल्याने १७ बालकांना विषबाधा)
ऑनलाईन तिकीट सुविधा
तिकिटासाठी सुटे पैसे नाही म्हणून अनेकवेळा कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वाद उद्भवतात. हे वाद टाळण्यासाठी ऑनलाईन पेमेंट सुविधा सुरू करण्यात येणार आहे. अनेक नागरिकांनी यासंदर्भात पीएमपीएमएलकडे ऑनलाईन तिकीट संदर्भात मागणी केली होती त्यानुसार ही सुविधा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बसमध्ये क्यूआर कोड लावण्यात येणार असून प्रवाशांना UPI, गुगल पे, फोन पे द्वारे हे पैसे जमा करता येतील. पैसे मिळाल्याचा संदेश पाहून वाहक त्यांना तिकीट देईल. त्यामुळे आता ऑनलाईन पेमेंट बसमध्ये करता येणार आहे. पुणे दर्शनच्या बसमध्ये ही सुविधा यशस्वी झाल्यास पुढील १५ दिवसांत pmpml च्या बसेसमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
बस लाईव्ह ट्रॅक
दरम्यान पीएमपीएमएलच्या प्रवाशांना आता बस लाईव्ह ट्रॅक करता येणार आहे. बस वाहतूककोंडीत अडकली आहे, बसला येण्यास उशीर लागेल. या सर्व बाबींचीही माहिती प्रवाशांना समजणार आहे. यासाठी पीएमपीने प्रायोगिक तत्त्वावर २० बस व २० मार्गांची निवड केली आहे. चार महिने गुगल याची चाचणी घेईल. त्यानंतर सर्व बस मार्गांवर अंमलबजावणी केली जाईल.
Join Our WhatsApp Community