राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आगामी वर्ष २०२३ या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या शुक्रवारी जाहीर केल्यात. यानुसार येत्या वर्षांत सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहे. पण या सुट्ट्यांमधील चार सुट्ट्या शनिवारी आणि रविवारी आल्याने त्या बुडाल्या आहेत.
(हेही वाचा – हॉटेल ताजच्या दहाव्या मजल्यावरून उडी घेऊन व्यवसायिकाची आत्महत्या)
या आहेत त्या २४ सुट्ट्या
प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी,
महाशिवरात्री १८ फेब्रुवारी,
छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी,
होळी (रंगपंचमी) ७ मार्च,
गुढीपाडवा २२ मार्च,
रामनवमी ३० मार्च,
महावीर जयंती ४ एप्रिल,
गुड फ्रायडे ७ एप्रिल,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल,
महाराष्ट्र दिन १ मे,
बुद्ध पौर्णिमा ५ मे,
बकरी ईद २८ जून,
मोहरम २९ जुलै,
स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट,
पारसी नववर्ष दिन १६ ऑगस्ट,
गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर,
ईद ए मिलाद २८ सप्टेंबर,
महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर,
दसरा २४ ऑक्टोबर,
दिवाळी लक्ष्मीपूजन १२ नोव्हेंबर,
गुरूनानक जयंती २७ नोव्हेंबर,
ख्रिसमस २७ डिसेंबर अशा मिळून २४ सार्वजनिक सुट्ट्या सरकारने शुक्रवारी जाहीर केल्या आहेत.
या हक्काच्या सुट्ट्यांना लागणार मुकावे
मात्र महाशिवरात्री, रमजान ईद, मोहरम हे सण शनिवारी तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती, दिवाळी लक्ष्मीपूजन रविवारी असल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्याच्या या हक्काच्या सुट्ट्यांना मुकावे लागणार आहे, त्यामुळे त्यांच्यात थोडीशी नाराजी आहे.
Join Our WhatsApp Community