मोदी सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि वेतनाबाबत मोठी योजना तयार केली जात आहे. या योजनेनंतर सर्वच कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनुसार, (EPFO) कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात वाढ करण्यासंदर्भातही चर्चा सुरू आहे. तर सरकार कर्मचाऱ्यांकरता देखील मोठा निर्णय लवकरच घेण्याच्या तयारीत आहे.
(हेही वाचा – आगामी वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्या! पण ‘या’ हक्काच्या सुट्ट्या बुडाल्या)
किमान वेतनात होणार वाढ
सध्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे १५ हजार रूपये इतके आहे. त्यात वाढकरून ते आता २१ हजार रूपये करण्यात येण्याची शक्यता आहे तर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन वाढल्यानंतर त्यांच्या पेन्शनमध्येही परिणामी वाढ होणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने २०१४ मध्येही कमीत कमी किमान वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता पुन्हा मोदी सरकार कर्मचाऱ्यांचे वेतन वाढविण्यासंदर्भात योजना तयार करत आहे. म्हत्त्वाचे म्हणजे कर्मचाऱ्यांचे वेतन वाढले तर त्यांचा पीएफचा वाटाही वाढेल.
पीएफचे होणार कॉन्ट्रिब्युशन
सध्या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाचे गणित हे १५ हजार रूपयांवर केले जाते. यामुळे ईपीएस खात्यात जास्तीत जास्त १२५० रूपये जमा होतात. परंतु जर सरकारने वेतन वाढवले तर कॉन्ट्रिब्युशनही वाढेल. वेतन वाढल्यानंतर मासिक कॉन्ट्रिब्युशन १७४९ रूपये इतके होऊ शकते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतरही अधिक पेन्शनचा फायदा मिळेल.
Join Our WhatsApp Community