राज्यपालांच्या विरोधातील पहिला बंद ‘या’ शहरात, ‘या’ तारखेला पुकारणार बंद!

132

राज्यपाल भगत सिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यानंतर त्यांच्या विरोधात राज्यभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. अशातच आता राज्यपाल यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी सर्वच स्तरातून मागणी होत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र बंदचे संकेत दिले आहेत. तर खासदार उदयनराजे भोसले यांनी आझाद मैदानावर विराट मोर्चाची हाक दिली आहे. यासह राज्यपाल कोश्यारींना हटवण्यासाठीच्या राजकीय हालचाली सुरू असताना पिंपरी चिंचवड येथील सामाजिक संघटना एकत्र आल्या आहेत. या सामाजिक संघटनांनी एकत्र येत पिंपरी चिंचवड बंदची हाक दिली. येत्या ८ तारखेला हा बंद पुकारण्यात येणार असून राज्यपालांच्या विरोधातील हा पहिला बंद असणार आहे.

(हेही वाचा – कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! EPFO पेन्शन आणि सॅलरीबाबत मोदी सरकारनं घेतला निर्णय)

राज्यपाल कोश्यारींच्या विरोधात सुरू असलेला विरोध हा अद्याप संपल्याचे दिसून येत नाही. आता पुण्यातील पिंपरी चिंचवडयेथील सर्व संघटनांनी एकत्र येत येत्या ८ तारखेला पिंपरी चिंचवड बंदची हाक दिली. विविध संघटना आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाही आक्रमक झाला असून मराठा क्रांती मोर्चा ७ दिवस राज्यात आंदोलन करणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर जाऊन ढोल वाजवणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज, रविवारी पहिले आंदोलन मंत्री अतुल सावेंच्या औरंगाबाद येथील घरासमोर केले. मराठा क्रांती मोर्चाने ढोल वाजवत राज्यपाल हटावचा नारा दिला. यावेळी काळी टोपी हाय हाय, राज्यपाल हटवलेच पाहिजे अशा घोषणाही त्यांनी दिल्यात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.