छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असे वक्तव्य भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केल्यामुळे राज्यात वाद पेटला, त्यावर प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र शिवरायांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण करण्याचा प्रयत्न करते, त्याचा मी निषेध करतो, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही, अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतु त्वरित चूक दुरुस्त केली. pic.twitter.com/Nyps1jqs7U
— Prasad Lad (@PrasadLadInd) December 4, 2022
काय म्हणाले प्रसाद लाड?
स्वराज्य कोकण भूमी या कार्यक्रमात बोलताना आपण स्पष्टपणे चूक सुधारत छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आणि स्वराज्याची स्थापना कोकणातून झाली. जन्म शिवनेरीवर झाला, असे माझ्याबाजूला बसलेल्या संजय यादव यांनी चूक सुधारत सांगितले. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या वक्तव्याचे राजकरण करत आहे. छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही, अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतु त्वरित चूक दुरुस्त केली. माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगीरी व्यक्त करतो, असे प्रसाद लाड म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सातत्याने वादग्रस्त विधाने करण्यात येत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर आता भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या विधानाने वाद निर्माण झाला.
(हेही वाचा छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यांवर राज ठाकरे म्हणाले…)
Join Our WhatsApp Community