WhatsApp वरुन ‘असे’ करा डाऊनलोड आधार आणि पॅन कार्ड

146

भारत सरकारचे ई- गव्हर्नन्स पोर्टल My Gov Helpdesk वरुन तुम्ही अनेक प्रकारच्या सेवांचा लाभ घेऊ शकता. सध्याच्या काळात जवळपास प्रत्येकजण व्हाॅट्सअॅपचा वापर करतो. व्हाॅट्सअॅप हे असे एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. ज्याचे जगभरात अनेक युजर्स आहेत.

भारतीय रेल्वेमध्ये खाण्यापासून ते ऑनलाईन तिकीट बुक करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी लोकांनी आता व्हाॅट्सअॅप वापरण्यास सुरुवात केली आहे. व्हाॅट्सअॅपचा अधिकाधिक वापर पाहता भारत सरकारनेही आता व्हाॅट्सअॅपवर नागरिकांना काही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड Whatsappवरुनच डाऊनलोड करु शकता.

भारत सरकारचे ई-गव्हर्नन्स पोर्टल My Gov Help desk वरुन तुम्ही अनेक प्रकारच्या सेवांचा लाभ घेऊ शकता. यामध्ये डिजीलाॅकरच्या मदतीने पॅन आणि आधारदेखील सहज डाऊनलोड करता येणार आहे. लोकांना डिजीलाॅकरच्या विविध सेवा देण्यासाठी व्हाॅट्सअॅपवर चॅटबाॅटही सुरु करण्यात आला आहे.

सरकारच्या या व्हाॅट्सअॅप चॅटबाॅटद्वारे तुम्हाला तुमचे आधार कार्ड डाऊनलोड करायचे असल्यास तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड संबंधित सर्व माहिती डिजीलाॅकरवर सेव्ह करावी लागेल.

( हेही वाचा: करा हो ‘लगीन घाई’… 2023 नवं वर्षातील जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् तिथी )

अशी मिळवा पॅन कार्ड, आधारची PDF

यासाठी तुम्ही अॅंड्राॅइड किंवा iOS डिव्हाईसवर डिजिलाॅकर अॅप डाऊनलोड करुन लाॅग इन करु शकता. यानंतर, तुमचा नंबर वापरुन, आधार आणि पॅन सेवा डिजीलाॅकरशी लिंक करा. Whatsapp द्वारे आधार कार्ड आणि पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला काही स्पेप्स फाॅलो करायच्या आहेत. त्यासाठी संबंधित क्रमांकावर तुम्हाला मेसेज करुन डीजीलाॅकर सुरु करायची आहे. त्यानंतर संबंधित माहिती भरुन तुम्हाला तुमच्या आधार आणि पॅन कार्डची PDF मिळेल.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.