गोवरच्या वाढत्या केसेसवर आरोग्यमंत्री आणि टास्क फोर्सची सोमवारी बैठक

211

रविवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गोवरचा उद्रेक झालेल्या ठिकाणांची संख्या ९६ वर पोहोचली आहे. गोवरच्या वाढत्या केसेसवर रविवारी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गोवर टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे यांच्याशी आणि इतर सदस्यांशी चर्चा केली. सोमवारी आरोग्यमंत्री तानाजी सावंत टास्क फोर्सची बैठक घेणार आहेत.

धुळे आणि जळगावातही रुग्ण 

धुळ्यात आणि जळगावातही गोवरचे रुग्ण सापडलेत. जळगाव शहरात मास्टर कॉलनी येथे ४ रुग्ण सापडले आहेत. तर १०२ संशयित रुग्ण आहेत. धुळे शहरात हजारखोली मोहल्ला, प्रभात नगरमध्ये ९ गोवरचे रुग्ण सापडलेत तर ५३ संशयित रुग्ण सापडले आहेत. धुळे ग्रामीण भागांत शिरपूर, इदगाह या भागात ५ रुग्ण तर ७८ संशयित रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात ८२३ गोवरबाधितांची संख्या पोहोचली आहे. तर संशयित रुग्णांची संख्या १२ हजार ८४१ नोंदवली आहे.

(हेही वाचा गुजरातमध्ये शाही इमाम म्हणतात, मुसलमानांनी एकजूट होऊन भाजपाला मतदान करू नये)

  • राज्यात आतापर्यंत सर्व्हेक्षण करण्यात आलेली घरे – १२ लाख ५८ हजार ७८०
  • अ जीवनसत्त्वाची मात्रा देण्यात आलेल्या बालकांची संख्या – ३० हजार ७६९
  • गोवर, रुबेला पहिला डोस देण्यात आलेल्या बालकांची संख्या – ११ हजार ५२१
  • गोवर, रुबेला दुसरा डोस देण्यात आलेल्या बालकांची संख्या – ८ हजार २७६
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.