गुजरात मतदानापूर्वी पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला

173

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांच्या आईसोबत असलेले नातेसंबंध अत्यंत चांगले आहेत. जेव्हा जेव्हा मोदी गुजरातला येतात तेव्हा तेव्हा ते आवर्जून त्यांच्या आईची भेट घेऊन तिचे आशीर्वाद घेत असतात. आताही पंतप्रधान मोदी हे गुजरातला मतदानासाठी आले. मात्र त्याआधी ते आवर्जून आईला भेटायला गेले. दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरा बा यांना भेटले. यावेळी मोदींनी काही काळ आपल्या आईशी गप्पा मारल्या आणि चहा प्यायला.

आईसोबत गप्पा मारल्या

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी रानीप येथे मतदानाचा हक्क बजावतील. त्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी घेतलेली आईची भेट चर्चेचा विषय ठरत आहे. या भेटीनंतर सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचे फोटो व्हायरल होत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या आईसोबत काहीवेळ घालवल्यानंतर ते येथून बाहेर पडले आणि पुढील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. यापूर्वी देखील पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमधल्या निवडणुकांच्या निकालानंतर मार्च महिन्यात आईची भेट घेतली होती.

(हेही वाचा गुजरातमध्ये शाही इमाम म्हणतात, मुसलमानांनी एकजूट होऊन भाजपाला मतदान करू नये)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.