वाढत्या महागाईने सर्वसामान्य लोक त्रस्त झालेले असताना एक दिलासादायक बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत गेल्या सहा महिन्यांपासून निच्चांकी पातळीवर असताना आजपासून म्हणजेच ५ डिसेंबरपासून देशात इंधन दर कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण होण्याचा अंदाज तज्ज्ञ मंडळींनी वर्तविला आहे.
(हेही वाचा -…तर गड-किल्ल्यांवरही वक्फ कब्जा करेल! )
अर्थविषयक वृत्त देणाऱ्या एका खासगी वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, इंधनाच्या किंमतीत मोठी घसरण होऊ शकते. ५ डिसेंबर रोजी हा नवा दर बघायला मिळू शकतो. गेल्या अनेक महिन्यांपासून इंधन दर कमी होण्याच्या प्रतिक्षेत वाहन धारक आहेत. पण त्यांना लवकरच दिलासादायक बातमी मिळणार आहे. तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या दाव्यानुसार, ५ डिसेंबर रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत ५ रूपयापर्यंत कपात होणार आहे. दरम्यान तज्ज्ञांच्या मते, गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारकडून हे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशात सध्या क्रूड ऑईलच्या किंमती ९० डॉलर प्रति बॅरलवर व्यापार करत आहेत. सध्या या किंमती ८२ डॉलरच्या जवळपास आहेत. नोव्हेंबर महिन्यात क्रूड ऑईलच्या किंमतीत ७ टक्के घसरण दिसून आली. त्यामुळे जनतेतही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची मागणी जोर धरत आहे. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात ५ रुपयांपर्यंत घसरण होईल. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Join Our WhatsApp Community