PMPML च्या प्रवाशांसाठी पुन्हा सुरू होणार ‘ITMS’ यंत्रणा, कसा होणार फायदा?

149

मागील दोन ते तीन वर्षांपासून बंद असलेली इंटेलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अर्थात ITMS यंत्रणा पीएमपीएमएल (PMPML) पुन्हा सुरू करत आहे. या अंतर्गत साधारण १ हजार बसमध्ये ऑन बोर्ड युनिट बसविण्यात आले असून उर्वरित बसमध्ये देखील ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. याचा फायदा आयटीएमएससाठी होणार आहे. ही यंत्रणा सुरू झाल्यावर प्रवाशांना पीएमपी बसचे लाईव्ह लोकेशन समजणार आहे.

(हेही वाचा – वसंत मोरेंच्या ‘या’ खंद्या शिलेदारासह 400 कार्यकर्त्यांची ‘मनसे’ला सोडचिठ्ठी)

इतकेच नाही तर प्रवाशांना प्रवास करत असताना पुढचा थांबा कोणता असणार, बस कोणत्या थांब्यावर थांबणार आहे, याची माहिती बसमध्येच डिस्प्ले बोर्डवर बघता येणार आहे. तसेच बसमध्ये जीपीएस ऑन बोर्ड युनिट बसविले आहे. ही यंत्रणा मध्यवर्ती कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आली आहे.

काय होणार या यंत्रणेचा फायदा

आयटीएमएस या यंत्रणेमुळे कोणत्या मार्गावर किती प्रवासी होते, बसच्या एका फेरीचे उत्पन्न किती ही माहिती जाणून घ्यायची असेल तर ती ही एका क्लिकवर मिळू शकते. बसचा वेग किती आहे, चालकाने कोणत्या बस थांब्यावर बस थांबवली हे देखील समजू शकणार आहे. त्यानुसार ‘पीएमपी’ला बसच्या वाहतुकीचे नियोजन करता येईल.

याद्वारे प्रवासी संख्या जाणून घेण्यास मदत होईल. त्यामुळे कोणत्या मार्गावर सेवा सुरू अथवा बंद ठेवायची याबाबतही पीएमपीला निर्णय घेता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५ वर्षापूर्वी ५२ कोटी रुपये खर्चून ही यंत्रणा सुरू झाली होती. मात्र, गेल्या काही वर्षात ही यंत्रणा बंद होती. आता पुन्हा ही यंत्रणा सुरू होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.