ऑनलाईन पेमेंटने सारे व्यवहार व्यापलेले असताना, एसटी प्रवासामध्ये तिकीटासाठी अजूनही रोख पैसे द्यावे लागतात. सुट्या पैशांसाठी वाहकासोबत अजूनही वाद घालावा लागतो. यावर उपाय म्हणून आता एसटीने ऑनलाइन पैसे देण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच अॅंड्राईड प्रणालीवर आधारित तिकीट मशिन्स वाहकांना देण्यात येणार आहेत. त्याद्वारे प्रवाशांकडून ऑनलाईन पेमेंट घेता येणार आहे.
मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाची बैठक आठवडाभरापूर्वी झाली, त्यामध्ये तिकिटांची सध्याची ईटीआय मशिन्स अॅंड्राॅईड प्रणालीला जोडण्याचे ठरले. प्रवाशाने दिलेले पैसे थेट महामंडळाकडे जमा होणार आहेत, त्यामुळे ड्यूटी संपल्यावर आगारात कॅशियरकडे पैसे जमा करुन हिशोब देण्याची वाहकांची कटकट संपणार आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात हजारो रुपयांची रोकड सांभाळण्याची जबाबदारीही कमी होणार आहे. प्रवाशांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, गुगल पे, फोन पे आदी ऑनलाईन प्रणालींद्वारे तिकीट काढता येईल.
( हेही वाचा: आळशी राजाचे राज्य टिकत नाही; बच्चू कडूंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र )
Join Our WhatsApp Community