मागच्या काही दिवसांपासून सीमावाद पुन्हा पेटला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर पुन्हा एकदा सीमाप्रश्न पेटला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादाबाबत मोठे विधान केले आहे. सीमावादाबाबत कर्नाटकही निर्णय घेऊ शकत नाही आणि महाराष्ट्रही निर्णय घेऊ शकत नाही. तर याबाबतचा अंतिम निर्णय हा सर्वोच्च न्यायालय घेणार आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला सुरु आहे. त्यामुळे याबाबत कर्नटकही निर्णय घेऊ शकत नाही आणि महाराष्ट्रही नाही. जो काही निर्णय असेल तो सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. मला असे वाटते की, त्यामुळे या संदर्भात विनाकारण नव्याने कुठलाही वाद निर्माण करणे योग्य ठरणार नाही. सीमावादाच्या खटल्यामध्ये महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयासमोर अतिशय ताकदीने बाजू मांडली आहे. आता आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास ठेवला पाहिजे.
( हेही वाचा: सासू विरुद्ध सून; जळगाव दूधसंघाच्या निवडणुकीत रक्षा खडसेंचा मंदा खडसेंविरोधात प्रचार )
…तर तिथे जाण्यापासून कोणीही रोखणार नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माननीय मुख्यमंत्री आम्हाला याबाबत अंतिम निर्णय देतील. महापरिनिर्वाण दिन आमच्यासाठी मोठा दिवस आहे. त्यादिवशी एखादे आंदोलन व्हावे. कुठलीही चुकीची घटना व्हावी हे योग्य नाही. भविष्यात आपल्याला तिथे जाता येईल. तिथे जाण्यापासून कुणी रोखू शकणार नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
Join Our WhatsApp Community