महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई बेळगाव दौ-यावर जाणार होते. परंतु हा प्रश्न अधिक चिघळू नये म्हणून हे दौरे रद्द केल्याचे वृत्त सध्या समोर येत आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. तर संजय राऊतांच्या टीकेला मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना प्रत्युत्तर दिले आहे.
आमच्यामध्ये काय हिंमत आहे हे संजय राऊतांना किमान आम्ही बाळासाहेबांची जी शिवसेना आहे, तिने पाच महिन्यांपूर्वीच त्यांना दाखवलेले आहे. आमची हिंमत काय आहे? आमच्यात काय धमक आहे? याचा संजय राऊतांनी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे आमच्याबाबत त्यांनी बोलू नये.
( हेही वाचा: बेळगाव दौरा अद्याप रद्द झालेला नाही; शंभूराज देसाईंचे स्पष्टीकरण )
तुम्ही केवळ बोलता आम्ही करुन दाखवतो
याशिवाय भाजप व शिवसेनेचे जे सरकार महाराष्ट्रात आहे, हे सरकार महाराष्ट्रातील मराठी भाषिकांची, सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न समजून घेणे, महाराष्ट्राकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत. याच्यांबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही तिथे जात आहोत. त्यामुळे कोणामध्ये धमक आहे आणि कोणामध्ये धमक नाही हे नुसते बोलण्यापेक्षा संजय राऊतांना माझे एवढेच सांगणे आहे, की जी तुमच्या काळात 2020 पासून सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांच्या सवलती, त्यांना राज्याकडून केली जाणारी मदत थांबली होती, ती शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर तत्काळ सुरु झालेली आहे. तुम्ही केवळ बोलता आम्ही करुन दाखवतो, असेही मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.
Join Our WhatsApp Community