‘या’ सरकारी बॅंकेत तुमचे खाते आहे का? तर होणार मोठा फायदा

172

कॅनरा बॅंकेने आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, आपल्या ग्राहकांसाठी ATM मधून पैसे काढणे, पाॅइंट ऑफ सेल आणि ई-काॅमर्स ट्रान्सजॅक्शनसाठी आपल्या डेली कार्ड ट्रान्जक्शनच्या लिमिटमध्ये तत्काळ प्रभावाने बदल करण्याची घोषणा केली आहे.

क्लासिक डेबिट कार्डसाठी डेली एटीएममधून पैसे काढण्याची लिमिट 40 हजार रुपयांवरुन 75 हजार रुपये करण्यात आली आहे. या कार्डांसाठी पीओएस लिमिट सध्याच्या 1 लाख रुपयांच्या लिमिटवरुन 2 लाख रुपये प्रतिदिन केली जाईल. एनएफसीसाठी बॅंकेने कोणतीही रक्कम वाढवली नाही, मर्यादा अद्याप 25 हजार रुपये निश्चित केली आहे. दरम्यान, काॅन्टॅक्टलेस ट्रान्जक्शन प्रति प्रसंगी 5 हजार रुपयांपर्यंत आणि दररोज 5 ट्रान्जक्शनसाठी परवानगी आहे.

कॅनरा बॅंकेच्या वेबसाईटनुसार, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कार्ड ट्रान्जक्शनवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जारी केलेले डीफाॅल्ट कार्ड केवळ एटीएन आणि पीओएसमध्ये घरगुती वापरासाठी वापरले जाऊ शकते. कार्ड जारी करताना आंतरराष्ट्रीय/ऑनलाईन वापर आणि काॅन्टक्टलेस वापरास परवानगी नाही. ग्राहकांना एटीएम/शाखा/मोबाईल बॅंकिंग/ इंटरनेट बॅंकिंग/ आयव्हीआरएसद्वारे कार्ड चॅनलनुसार/ पीओएस/ ई- काॅमर्स, घरगुती/आंतरराष्ट्रीय, एनएफसी चालू/ बंद करण्याची आणि लिमिट सेट करण्याची सुविधा दिली जाते.

( हेही वाचा: सांताक्रूझमधील व्यावसायिकाच्या पत्नीने सद्दाम हुसेनचा तो फार्म्युला वापरत केला घात )

PNB डेबिट कार्ड ट्रान्जक्शन

पंजाब नॅशनल बॅंकेने डेबिट कार्ड ट्रान्जक्शन लिमिटमध्ये बदल करण्याची शिफारस केली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या वेबसाईटनुसार, बॅंक सर्व प्लॅटिनम मास्टरकार्ड, रुपे आणि व्हिसा गोल्ड डेबिट कार्ड तसेच रुपये सिलेक्ट आणि व्हिसा सिग्नेचर डेबिट कार्डसाठी लिमिट वाढवणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.