अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या क्रूझवरील अंमली पदार्थ प्रकरणी झालेल्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे, अॅड. सुबोध पाठक (पालघर) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सोमवार, 5 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता पत्रकार भवन येथे हिंदू महासंघाच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनोज तारे, प्रीतम देसाई उपस्थित होते.
घटनास्थळी रंगेहाथ पकडले गेलेल्या, गुन्हा मान्य असल्याचे तपास अधिकाऱ्यांपुढे मान्य केलेल्या आणि त्याच आधारावर खालच्या न्यायालयाने 2 वेळा जामीन नाकारल्या गेलेल्या आर्यन खान आणि त्याच्या सहकाऱ्यांना तपास यंत्रणांनी आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन निर्दोष मुक्त केले, असे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा पुरातत्व विभागाचे अधिकारीच गड-किल्ल्यांवरील इस्लामी अतिक्रमणाला जबाबदार!)
तपास अधिका-यांवर संशय
या संपूर्ण घटनेच्या विरोधात हिंदू महासंघाने 13 जुलै 2022 रोजी न्यायालयात आव्हान दिले असून या संपूर्ण प्रक्रियेत तपास यंत्रणा किती गाफिल राहिल्या, त्यांनी कसे त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन या सर्व आरोपींना मदत केली, हे मुद्दे उपस्थित केले. याची पूर्ण 36 पानांची कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community