शिवप्रतापात वापरलेली वाघ नखं राज्य सरकार ब्रिटनमधून आणणार

141

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघ नखांनी अफझल खानाचा वध केला, ती वाघ नखं महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारने सुरू केला आहे. त्यासाठी राज्य सरकार केंद्राशी समन्वय साधणार आहे.

केंद्राची मदत घेणार

ब्रिटनमध्ये असलेल्या जगदंब तलवारीबरोबरच वाघ नखं देखील मुंबईतील प्रस्तावित संग्रहालयामध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. यासाठी केंद्राशी देखील समन्वय साधला जाणार आहे. ६ जून २०२४ ला शिवराज्याभिषेकाच्या 350 वर्षे पूर्ण होण्याच्या औचित्यावर ही महत्त्वाची बाब असल्याचे वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. केंद्र सरकारने याकरता सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे. महाराष्ट्र वीरतेचे केंद्र आहे, हे राज्य पुन्हा एकदा राज्याभिषेकाचा सोहळा साजरा करणार आहे. हा राज्याभिषेक देशाच्या रक्षणासाठी करण्यात आला होता, जो अन्याय, अत्याचार होत होता, त्यांचा प्रतिकार करण्यासाठी हा राज्याभिषेक झाला होता, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

(हेही वाचा मुसलमान कुटुंबावर धर्मांतर विरोधी कायद्याचा उगारला बडगा, हिंदू तरुणीचे जबरदस्तीने केले धर्मांतर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.