शिवसेना ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून राज्यातील अनेक ठिकाणे पिंजून काढत आहेत. सुषमा अंधारे या सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारसह मनसेवर टीका करताना दिसत आहेत. अशातच सुषमा अंधारेंची उस्मानाबाद येथील महाप्रबोधन यात्रा उधळून लावू असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
(हेही वाचा – PF बॅलेन्स तपासणं झालं सोपं! EPFO पोर्टलवर जाऊन असा चेक करा बॅलेन्स)
सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर आरोप केला होता. यानंतर मनसे आक्रमक होत त्यावर सुषमा अंधारे यांनी माफी मागावी, असे मनसेने म्हटले. तक सभा उधळणाऱ्यांचे स्वागत आहे, असे प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिले आहे.
‘त्या’ विधानावर मनसे आक्रमक
सुषमा अंधारेंनी मुंबईतील एका जाहीर सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावेळी त्या म्हणाल्या की, आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे. त्याचा उठ दुपारी आणि घे सुपारी… असाच कार्यक्रम असतो. ते अचानक गुहेतून बाहेर येतात. अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात. या विधानावर मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, अशातच उस्मानाबाद येथे सुषमा अंधारेंची जाहीर महाप्रबोधन सभा होत आहे. राज ठाकरेंबद्दल अपशब्द वापरणाऱ्या सुषमा अंधारेंनी आधी माफी मागावी अन्यथा त्यांची महाप्रबोधन यात्रा उधळून लावू, असा इशारा मनसे जिल्हा प्रमुख राजेंद्र गपाट यांनी दिला आहे.