भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अन्य मान्यवरांसह संसद भवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अपर्ण केली़. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनकड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री डॉ. विरेंद्र कुमार, प्रल्हाद जोशी, अर्जुन राम मेघवाल, रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खर्गे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य मोठे आहे. त्यांच्याकडून जगण्याची प्रेरणा मिळते. तसेच संविधानामुळे सामान्य जनतेचं आयुष्य बदलले असे सांगत महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी चैत्यभूमीवरून जनतेला संबोधित केले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी पक्षाचे विविध पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशाला संविधान मिळाले. त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी, दादर येथे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आणि आदरांजली वाहिली. याप्रसंगी शिवसेना नेते, उपनेते, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईतली दादरमधील चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहिली.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त जामखेडमधील संविधान चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रोहित पवार यांनी अभिवादन केले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चैत्यभूमी, दादर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
Join Our WhatsApp Community