कोरोनाची लाट, रशिया-युक्रेन युद्ध आणि वाढती महागाई यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता, भारताचा विकासदर ७.१ असा अंदाजित होता,मात्र जागतिक बँकेने मागील वर्षी तो थेट ६.५ वर आणला होता. मात्र आता जागतिक बँकेने यात बदल करून तो २०२२-२३ साठी ६.९ अंदाजित केला आहे. त्यामुळे भारतासाठी पुढचे दिवस सुगीचे असणार असे दिसत आहे.
महागाई दरातही घट
वस्तूंच्या चढ्या किमती आणि चलनविषयक धोरण लक्षात घेऊन जीडीपी (GDP) चा हा अंदाज लावण्यात आला आहे. भारताची अर्थव्यवस्था जागतिक धक्क्यांना चांगल्या प्रकारे हाताळत आहे. या वर्षी सरासरी किरकोळ महागाई ७.१ टक्के असू शकते. रिझर्व्ह बँकेच्या समाधानकारक श्रेणीपेक्षा खूप वर आहे. या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७ टक्के वेगाने वाढेल, असा अंदाज देशाची केंद्रीय बँक, आरबीआयने व्यक्त केला आहे. यापूर्वी आरबीआयचा अंदाज ७.२ टक्के होता, ज्यात बँकेने कपात केली आहे. विशेष म्हणजे जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताचा जीडीपी विकास दर ६.३ टक्के होता तर, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत तो ८.४ टक्के होता.
(हेही वाचा ६ डिसेंबर ‘शौर्य दिवस’ म्हणून का होतोय ट्विटर ट्रेंड?)
Join Our WhatsApp Community