कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना फोन करीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या हेतूने महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगाव दौरा रद्द केला. असे असताना कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर धुडगूस घातला. आज कोल्हापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली.
(हेही वाचा ६ डिसेंबर ‘शौर्य दिवस’ म्हणून का होतोय ट्विटर ट्रेंड?)
बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात आपली नाराजी नोंदविली. यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. यासोबतच महाराष्ट्रातून येणार्या वाहनांना संरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली.
संयम ठेवून आहोत, म्हणजे हतबल नव्हे!
गेल्या अनेक वर्षांपासून कन्नड रक्षण वेदिके संघटनेकडून जाणीवपूर्वक महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रकार सुरू आहे. पोलिसांचा फौजफाटा असतानाही वाहनांवर हल्ला होत असेल, तर त्यांना कोणी फुस लावतेय, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. आम्ही संयम ठेऊन आहोत म्हणजे हतबल नाही. देशात उभी फूट पाडणे योग्य नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आक्रमक नाही, असं कोणी समजू नये, असा इशारा मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.
(हेही वाचा Maharashtra-Karnataka Border Dispute : बेळगावनजीक कानडींचा धुडगूस; शिंदे सरकारचे मंत्री म्हणाले… )
Join Our WhatsApp Community