राज्यात दिल्लीतून येतोय गुटखा…राज्यातील हा भाग ठरतोय विक्रीचा हॉटस्पॉट

163

सोमवारी भिवंडी येथे अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणा-या दोन वाहनांना अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी झडती घेतली. या दोन वाहनांची तपासणी केली असता राज्यात गुटखा विक्रीस बंदी असतानाही गुटखा दिल्लीतून राज्यात विकला जात असल्याचा प्रकार अधिका-यांच्या लक्षात आला. दिल्लीतून आलेला ट्रक भिवंडीत थांबवून राज्यातील किनारपट्टी भागांत विक्रीसाठी पाठवला जात असल्याचे निरीक्षण अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी नोंदवले. यंदाच्या वर्षांत भिवंडीत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांना १७ कारवाया केल्या आहेत.

राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी आदी मालाची विक्री करता येत नाही. त्यामुळे राज्यात देशांतील इतर भागांतून चोरीछुपे माल येतो. किनारपट्टीला लागून असलेल्या वसई, पालघर, मुंबई तसेच दक्षिणेकडील भागांत मालाची ने-आण करायला भिवंडी हे हॉटस्पॉट बनले आहे. या भागांतील लोकवस्तीत राहणा-या कित्येकांकडे तसेच गोदामांतील साठवणूकीत अवैध माल सापडत आहे.

(हेही वाचा ६ डिसेंबर ‘शौर्य दिवस’ म्हणून का होतोय ट्विटर ट्रेंड?)

नेमकी घटना काय?

सध्या भिवंडी तसेच नवी मुंबई, ठाणे या भागांत शीतगृहे, तसेच खाद्यमालाची वाहतूक करणा-या वाहने अन्न व औषध प्रशासनाच्या रडारवर आहे. सोमवारी भिवंडीतील शुभम इंडस्ट्रीज पार्क येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी धाड टाकली. शुभम इंडस्ट्रीज पार्क परिसरात गुटख्याचा माल एका ट्रकमधून दुस-या ट्रकमध्ये नेला जात असताना अधिका-यांनी वाहनचालकांना रंगेहाथ पकडले. दोन्ही ट्रक तसेच आरोपींना अन्न व औषध  प्रशासनाच्या अधिका-यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तब्बल ४७ लाख ५२ हजारांचा माल अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी जप्त केला.

भिवंडीतून वर्षभरात तीन कोटींपेक्षा जास्त माल पकडला

भिवंडी हे अवैध मालाचे हॉटस्पॉट ठरत असल्याने सध्या अन्न व औषध प्रशासनाने या भागांत कडक कारवाया वर्षाच्या सुरुवातीपासून सुरु केल्या आहेत. आतापर्यंत १७ कारवायांतून तीन कोटींपेक्षा जास्त माल जप्त केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी दिली.

(हेही वाचा Maharashtra-Karnataka Border Dispute : बेळगावनजीक कानडींचा धुडगूस; शिंदे सरकारचे मंत्री म्हणाले… )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.