धारावीतील शीव रुग्णालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक ७ जवळील आंबेडकर चौकामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प मुंबई महापालिकेच्या एफ उत्तर विभागाच्यावतीने बनण्यात आले. मुंबईतील सुशोभिकरणाअंतर्गत या चौकाचेही सुशोभिरकण करून बाबासाहेबांचे शिल्प बनवण्यात आले. याचे अनावरण स्थानिक आमदार व माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
( हेही वाचा : राष्ट्रीय उद्यानात गुजरातहून पुन्हा सिंह आणणार!)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सायन रुग्णालय गेट नंबर ७ जवळील आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिल्पाचे अनावरण माजी शिक्षण मंत्री व धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस नेते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, एफ -उत्तर विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे उपस्थित होते.
शीव रुग्णालयाच्या समोरील आंबेडकर चौकात बाबासाहेबांचे शिल्प उभारण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती. त्यामुळे चौकांच्या सुशोभिकरण कार्यक्रमांतर्गत या चौकात बाबासाहेबांचे शिल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानुसार हे शिल्प बनवण्यात आले आहे. याचे अनावरण बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाणदिनाचे औचित्य साधून करण्यात आले. या अनावरण प्रसंगी धारावीतील प्रभाग क्रमांक १८९चे समन्वयक महादेव नारायणे व धारावीचे समन्वयक जीआउद्दिन शेख, बेंजामिन काकडे, अभय देठे, महेश रामटेके व प्रशांत उनावणे तसेच मुंबई काँग्रेसचे चिटणीस आर गोपाल व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे माटुंगा लेबर कॅम्प अध्यक्ष दीपक वाघ आदी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community