मुंबईकरांनो आता खराब हवेपासून वाचण्यासाठी वापरा एन-९५ किंवा पी-१०० मास्क…

149

मुंबईत तापमानात चढ-उतार सुरु असताना आता हवेचा दर्जा सलग दुस-या दिवशी अतिखराब असल्याचे सफर या ऑनलाईन प्रणालीत मंगळवारी नोंदवले गेले. दिल्लीखालोखाल मुंबईतील हवेचा दर्जा अतिखराब दिसून आला. दिल्लीतील हवेचा दर्जा ३२९ वर नोंदवला गेला. तर मुंबईत हवेचा दर्जा ३६९ पर्यंत नोंदवला गेल्याने घराबाहेर जाण्यापूर्वी तोंडावर एन-९५ किंवा पी-१०० मास्क लावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

श्वसनाच्या रोगावरील तज्ज्ञ डॉ. चेतन जैन यांनी वाढत्या हवेच्या प्रदूषणात फुफ्फुसाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली. हवा खराब होताच अस्थमा, सीओपीडी तसेच हवेच्या संपर्कातून होणा-या विविध आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येते. हवेच्या संपर्कातून होणा-या आजारांमध्ये वाढ होत असल्याचे निरीक्षणही डॉ. जैन यांनी नोंदवले. या दिवसांत तोंडावर साधे मास्क लावून खराब हवेतून श्वसनावाटे शरीरात जाणा-या धूलिकणांपासून वाचता येत नाही, त्याकरिता तोंडावर व्यवस्थित राहील असा मास्क वापरणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉ. जैन यांना दिला.

मुंबईतील विविध स्थानकांतील हवेचा दर्जा (प्रति क्युबिट मीटरमध्ये)

अतिखराब स्थानके –

  • माझगाव – ३८५
  • चेंबूर – ३४७
  • मालाड – ३२२
  • कुलाबा – ३०५
  • खराब स्थानके –
  • भांडुप – ३००
  • अंधेरी – २२८
  • बोरिवली – २०८
  • वरळी – २०१
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.