अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात दोन बिबट्यांचा मंगळवारी संशयास्पदरित्या मृतदेह आढळला. मेळघाटातील सिपना वनपरिक्षेत्रातील सीमाडोह या अतिसंरक्षित भागांत दोन्ही बिबट्यांचे मृतदेह पाचशे मीटरच्या अंतरावर आढळले. वनाधिका-यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, दोन्ही बिबट्यांचा मृत्यू व्हायरल संसर्गामुळे झाला असावा. परंतु शवविच्छेदन अहवालाअंती नेमके कारण समजेल, अशी माहिती वनाधिका-यांनी दिली. दोन बिबट्यांचा मृतदेह आढळल्यानंतर या घटनेमागे विषबाधा झाली आहे, याबाबतही तपास सुरु करण्यात आला आहे.
( हेही वाचा : महिलांना फसवून वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या धर्मांध मुसलमानांना अटक)
नेमकी घटना काय
मंगळवारी दुपारी मेळघाटातील अतिसंरक्षित भागात सकाळी साडेनऊच्या सुमारास नर बिबट्याचा मृतदेह वनाधिका-यांना आढळला. या बिबट्याचे वय अंदाजे तीन वर्ष असावे, असा अंदाज पशुवैद्यकीय अधिका-यांनी व्यक्त केला. या बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिका-यांनी शविवच्छेदन प्रक्रिया पार पडली. त्याचदरम्यान घटनास्थळापासून पाचशे मीटर अंतरावर मादी बिबट्याचा मृतदेह वनाधिका-यांना सापडला. अंदाजे दीड वर्षांच्या मादी बिबट्याचा मृतदेह अकरा वाजण्याच्या सुमारास वनाधिका-यांना आढळला. दोन्ही घटना पाहता हा मृत्यू नैसर्गिक आहे की नाही, याबाबत निश्चित सांगता येत नाही, असे वनाधिका-यांनी सांगितले. नागपूर येथील गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात दोन्ही मृतदेहाचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवालानंतर याबाबत निश्चित माहिती दिली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
Join Our WhatsApp Community