नॉन स्टिक तव्याचे कोटींग खराब होऊ नये म्हणून गृहिणींसाठी ७ खास टिप्स!

163

नॉन स्टिक तवा किंवा पॅन आपण नियमितपणे वापरत असतो. प्रामुख्याने डोसा करण्यासाठी घरोघरी नॉन स्टिक तव्याचा वापर केला जातो. परंतु हा महागडा तवा काही दिवसांत खराब होण्याची शक्यता असते. या तव्याच्या वरच्या बाजूला थर जमा होतो आणि कालांतराने कोटिंग निघते. कोटिंग निगाल्यामुळे डोसा किंवा थालीपिठासारखे पदार्थ तव्याला चिकटू लागतात. अशावेळी आपण काय खबरदारी घेतली पाहिजे यासाठी प्रसिद्ध शेफ पंकज भदौरिया यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत काही टिप्स दिल्या आहेत…

( हेही वाचा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विशेष उपाययोजना; सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर प्रशासन सतर्क)

नॉन स्टिक तवा खराब होऊ नये म्हणून गृहिणींसाठी खास टिप्स…

  • जेवण झाल्यावर या तव्यात कोमट पाणी आणि साबण घालून ठेवा त्यानंतर हलक्या हाताने तवा स्वच्छ धुवा.
  • नॉन स्टिक तव्यावर जेवण बनवताना कायम लाकडी किंवा सिलिकॉनचा चमचा वापरा. घाईगडबडीत स्टिल किंवा अन्य धातूचा चमचा या तव्यावर वापरू नका यामुळे तुमचा तवा खराब होईल.
  • नॉन स्टिक पॅनमध्ये मोठ्या गॅसवर पदार्थ शिजवू नका. गॅसची फ्लेम कमी किंवा मध्यम करून जेवण बनवा.
  • पॅन गरम असताना चुकूनही धूवू नका यामुळे वरचा थर खराब होतो.
  • तारेच्या घासणीने या तव्याला धुवू नका, स्वच्छ करण्यासाठी सॉफ्ट स्पंजचा वापर करा.
  • तवा धुतल्यावर तो ठेवताना तव्याला न विसरता २ थेंब तेल लावा यामुळे तुमचा तवा दिर्घकाळ चांगला राहण्यास मदत होईल.
  • तव्यावर तेलाचे किंवा अन्य कोणतेही थर जमा होतात तेव्हा बेकींग सोडा आणि पाणी एकत्र करून तवा स्पंजने स्वच्छ करावा.

या टिप्स फॉलो केल्यास तुमचा नॉन स्टिक तवा चांगला ठेवण्यास तुम्हाला निश्चितच मदत होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.