कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी. कोकण रेल्वे मार्गावरील गाड्याचे वेळापत्रक कोलमडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ही एक्स्प्रेस कोकिसरे ते वैभववाडी रेल्वे स्टेशनदरम्यान बंद पडली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक साधारण तीन तास उशिराने सुरू आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांचे हाल होत आहेत.
(हेही वाचा – ऐन गर्दीच्या वेळी ‘मध्य रेल्वे’ची वाहतूक विस्कळीत, मुंबई लोकलच्या प्रवाशांचा खोळंबा)
आज, बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. कोकण कन्या एक्स्प्रेस ही मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जात असताना कोकिसरे रेल्वे फाटकापासून काही अंतरावर पोहोचताच तिच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ही एक्स्प्रेस ठप्प झाली. या घटनेची माहिती मिळताच राजापूर स्टेशनवरून नवीन इंजिन उपलब्ध करण्यात आले असून कोकण कन्या एक्स्प्रेसचे इंजिन बदलण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनामधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी अजूनही अर्धा ते एक तास लागणार आहे. कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्वच गाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम झाल्याने कोकण मार्गावरील धावणाऱ्या इतर गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून त्यांची मोठी गैरसोय झाली आहे.
Join Our WhatsApp Community