कर्ज घेणं महागणार, सर्वसामान्यांना धक्का! RBI कडून रेपो रेटमध्ये ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ

142

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सलग पाचव्यांदा पॉलिसी व्याजदर रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांनी वाढ केली आहे. यासह, रेपो दर 5.90 वरून 6.25 टक्के झाला. चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली. रेपो दरात वाढ झाल्याने सर्व प्रकारची कर्जे महाग होणार असल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

(हेही वाचा – AIIMS नंतर ICMR च्या वेबसाईट हॅकर्सचा डोळा; 24 तासांत 6000 वेळा सायबर हल्ला)

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे आता होमलोनसह सर्वप्रकारची कर्जे महागणार आहेत. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात मे महिन्यापासून पाचव्यांदा धोरणात्मक व्याजदर रेपो दरात वाढ केली आहे. यापूर्वी, आरबीआयने मेमध्ये रेपो दरात 0.40 टक्के, जूनमध्ये 0.50 टक्के आणि ऑगस्टमध्ये 0.50 टक्के, सप्टेंबरमध्ये 0.50 टक्के वाढ केली होती. त्याच वेळी, अनेक रेटिंग एजन्सींनी जीडीपी वाढीच्या अंदाजात कपात केली आहे. दरम्यान, मे महिन्यात व्याजदरांमध्ये अचानक 0.40 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. रेपो रेट वाढण्याचा परिणाम होमलोन, कार लोन आण पर्सनल लोन यांच्या ईएमआयवर पडणार आहे.

एमपीसीच्या तीन दिवसीय बैठकीनंतर बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, वाढती महागाई लक्षात घेता, पुन्हा एकदा रेपो दरात 0.35 टक्क्यांनी वाढ करण्यात येत आहे. यासोबतच शक्तीकांत दास यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी GDP वाढीचा अंदाज 7 टक्क्यांवरून 6.8 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा विश्वास व्यक्त केला. दास म्हणाले की, जागतिक अनिश्चितता असूनही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर चलनवाढ नियंत्रित करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. मूळ चलनवाढीचा दर अजूनही उच्च आहे, अशा परिस्थितीत चलनविषयक धोरणाच्या पातळीवर विवेकाची गरज आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता, अन्नधान्य टंचाई आणि इंधनाच्या चढ्या किमती यांचा सर्वाधिक फटका गरिबांना बसला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.