बेस्ट उपक्रमाच्या वीज ग्राहकांच्या खंडित झालेला वीजपुरवठा आधुनिक तंत्रज्ञान वापरून तातडीने सुरळीत करण्यात येणार आहे. यामुळे बेस्ट वीज विभागाच्या १० लाखांहून अधिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बेस्ट उपक्रमाने यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी ४८७ कोटींची तरतूद केली आहे. मुंबईसारख्या शहरात २४ तास उद्योगधंदा सुरू असतो. मुंबई शहरात बेस्ट उपक्रम टाटा वीज कंपनीकडून वीज खरेदी करून माफक दरात ग्राहकांना वीज पुरवठा करते. मुंबईत मंत्रालय, विधानसभा परिसर, उपमुख्यमंत्री, राज्यमंत्री यांची निवासस्थाने आहेत शिवाय रुग्णालये, न्यायलय विद्यापीठ, मोठमोठ्या उद्योगपतींची घरे सुद्धा मुंबईत आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला की तात्काळ बेस्ट वीज विभागात ग्राहकांकडून तक्रार येण्यास सुरूवात होते.
( हेही वाचा : हाताला झाली होती दुखापत तरीही हार न मानता… मीराबाई चानूने जिंकले ‘रौप्यपदक’ )
ग्राहकांना तात्काळ तक्रार यावी यासाठी विशेष यंत्रणा
वीज पुरवठा सुरूळीत पुन्हा सुरू ठेवण्यासाठी वीज विभागाला आवश्यक प्रयत्न करावे लागतात. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता उपक्रमाचे प्रयत्न सुरू आहेत. आता मुंबईत वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कोणत्याही कारणास्तव खंडित झाला तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांना तात्काळ तक्रार करता येईल.
तक्रार प्राप्त झाल्यावर बेस्ट वीज विभागाची यंत्रणा तात्काळ संबंधित ग्राहकाच्या घरी अथवा कार्यालयात जाऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करेल. बेस्ट वीज विभाग आणि ग्राहक यांच्यामध्ये तक्रारीच्या मेसेजची देवाणघेवाण पूर्णपणे ऑनलाईन किंवा अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून केली जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community