पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते स्वारगेट या ११.४ किमीच्या मार्गामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा ६ किमीचा मार्ग भुयारी आहे. या भूमिगत मार्गाच्या भुयाराचे काम टनेल बोअरिंग मशीनच्या मदतीने पूर्ण करण्यात आले. मेट्रोच्या भुयारामध्ये ट्रक, ओव्हरहेड विद्युत तारा आणि सिग्नलिंगची कामे वेगाने करण्यात आली.
( हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटले अन् गाडी थेट दरीत कोसळली…)
भूमिगत मेट्रोच्या पहिल्या ३ किलोमीटरच्या टप्प्यावर पुणे मेट्रोची चाचणी घेण्यात आली, शिवाजी नगर ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर ही चाचणी घेण्यात आली. मार्च २०२३ पर्यंत पुणे मेट्रो सुरू होण्याचा मेट्रो प्रशासनाचा निर्धार आहे. येत्या काही दिवसात पुणेकरांसाठी भूमिगत मार्गावर मेट्रो सेवा उपलब्ध असले.
कशी झाली पहिली चाचणी?
पुण्यातील भूमिगत मेट्रोच्या पहिल्या ३ किलोमीटर मार्गावर मेट्रो चाचणी घेण्यात आली. पुण्यातील रेंज हिल डेपोपासून एलिव्हेटेड मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रो धावली. त्यानंतर मेट्रो रॅम्पच्या साहाय्याने भूमिगत ट्रॅकवर आणण्यात आली. शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवर या ट्रेनची चाचणी करण्यात आली. पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रो स्थानकाचे काम हे ८५ टक्क्यांहून अधिक झाले आहे अशी माहिती मेट्रो अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे पुणेकरांना लवकरच भूमिगत मार्गावरील मेट्रोत प्रवास करता येणार आहे.
Join Our WhatsApp Community