देशातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका योजनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये सरकार महिलांना २.२० लाख देणार असा दावा करण्यात येत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये मोदी सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी नवीन योजना सुरू केली असून याचे नाव पीएम नारी शक्ती योजना असे आहे असे सांगण्यात येत आहे.
( हेही वाचा : FIFA World Cup : अंतिम सामन्यात ट्रॉफीचे अनावरण करण्याचा मिळाला बहुमान, ठरणार पहिली भारतीय अभिनेत्री)
पीआयबीने केले फॅक्ट चेक
महिलांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्याठी ही योजना राबवण्यात येत आहे अशी माहिती इंडियन जॉब या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून दिली जात आहे. यात केंद्र सरकार महिलेला २.२० लाख रुपयांची आर्थिक मदत करणार असेही सांगण्यात येत आहे या व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घेण्यासाठी पीआयबीने फॅक्ट चेक केले आहे.
पीआयबी फॅक्ट चेकने संपूर्ण माहिती घेऊन अशी कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले आहे. व्हायरल होणारा व्हिडिओ पूर्णपणे खोटा असून अशी कोणतीही योजना राबवली जात नसल्याचे पीआयबीने आपल्या ट्विटरवर सांगितले आहे.
नागरिकांनी सत्यता पडताळणे आवश्यक
गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे अशा बनावट योजनांच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक केली जाते. नागरिकांनी अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पीआयबीने केले आहे. एखाद्या योजनेसंदर्भातील मेसेज तुमच्याकडे आला असेल तर त्याची सत्यता तपासण्यासाठी नागरिक https:factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्या तसेच whatsapp नंबर +918799711259 किंवा [email protected] या ई-मेलवर व्हिडिओ पाठवून फॅक्ट चेक करू शकता.
Join Our WhatsApp Community'इंडियन जॉब' नामक #YouTube चैनल द्वारा यह दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार सभी महिलाओं को 'प्रधानमंत्री नारी शक्ति योजना' के तहत 2 लाख 20 हजार रूपए देने जा रही है।#PIBFactCheck
▶️यह दावा #फर्जी है।
▶️केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं लाई गई है। pic.twitter.com/FL3Ji8Oydc
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 6, 2022