गुजरात आणि हिमाचल राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवार, ७ डिसेंबर रोजी लागणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी म्हणाले बुधवारी, ६ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हिमाचल काँग्रेसमधील ३० नेत्यांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसने इतका मोठा निर्णय घेण्यामागे काही महत्त्वाची कारणे असल्याची चर्चा आहे. यापैकी पक्षाविरोधात काम करणे हे महत्वाचे कारण आहे.
पक्षविरोधी काम केल्याचा आरोप
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने मोठा निर्णय घेतल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी पक्षाच्या 30 नेत्यांची हकालपट्टी केल्याने खळबळ उडाली आहे. सर्व 30 नेत्यांची पुढच्या 6 वर्षांसाठी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून हकालपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी, ८ डिसेंबर रोजी हिमाचल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असताना आदल्या दिवशी काँग्रेसने याच राज्यातील ३० नेत्यांची हकालपट्टी करणे यावरून काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत जोरदार फटका बसणार असल्याचे दिसत आहे.
(हेही वाचा दिल्ली महापालिकेत ‘आप’ला बहुमत; महापौर मात्र भाजपचा? )
Join Our WhatsApp Community