रेशनकार्ड धारकांसाठी सरकारची मोठी घोषणा! १५० किलो धान्य मिळणार मोफत

179

रेशनकार्ड धारकांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. रेशनकार्ड असलेल्या नागरिकांना सरकारने १५० किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. रेशनकार्डमुळे देशातील लोकांना विविध योजनांचा लाभ मिळतो. याद्वारे अनेकांना फायदा मिळतो.

( हेही वाचा : मालकी हक्काच्या घरांसाठी सफाई कामगार धडकणार आमदारांच्या घरी)

कोणाला मिळणार लाभ?

देशभरातील करोडो लोक मोफत रेशनचा लाभ घेत आहेत. आतापर्यंत एका कुटुंबाला प्रति युनिट सुमारे ३५ किलो तांदूळ मिळत होता. याचे प्रमाण आता १३० ते १५० किलोपर्यंत वाढवले ​​जात आहे.

छत्तीसगडमधील बीपीएल कार्डधारकांसाठी सरकारने ही घोषणा केली आहे. त्यामुळे याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही छत्तीसगडचे रहिवासी असणे आवश्यक आहे. या अंतर्गत तुम्हाला ४५ किलो ते १५० किलोपर्यंत तांदूळ अगदी मोफत मिळेल. सरकारने यासाठी काही अटी घातल्या आहेत.

केंद्र सरकारकडून मोफत रेशनचे वाटप ऑक्टोबरमध्येच केले जाणार होते, परंतु ही योजना सुरू झालेली नाही. छत्तीसगडमध्ये ऑक्टोबरपासून तांदूळ दिलेला नाही. आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचा तांदूळ डिसेंबरमध्ये एकत्र वाटला जाईल. त्यामुळे तांदळाचे प्रमाण तिपटीने वाढणार आहे. तांदळाचे प्रमाण कुटुंबातील सदस्यांनुसार ठरवले जाईल. केंद्र सरकारकडून आलेल्या लॉटमुळे रेशन कार्डधारकांना एकत्रित वाटप केले जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.