उद्धव ठाकरे आता पुन्हा फॉर्मात आले आहेत. संजय राऊत आणि ठाकरेंना पुन्हा एकदा शिवसेना-उबाठा गटाचा मुख्यमंत्री करायचा आहे. परंतु त्यांच्या मते यंदा महिला मुख्यमंत्री होणार आहे. महिला मुख्यमंत्री हा शब्द ऐकून उद्धव ठाकरे गटातील सुषमा अंधारे यांच्या “मन मे लड्डू फुटले”. जरी सुषमा अंधारेंनी आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही असे म्हटले असले तरी सगळ्यात जास्त आनंद त्यांनाच झाला असणार.
( हेही वाचा : हवा अजूनही खराब.. खोलीच्या खिडक्या बंद ठेवण्याचे आवाहन)
कारण संजय राऊत यांच्या नंतर सुषमा अंधारे ह्या आता ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्या आहेत. त्यांच्यामुळे इतर महिला नेत्या मागे पडल्या आहेत. उबाठा गटात दुसर्या कुणाला फारसा सन्मान मिळत नसल्याने देखील समस्या निर्माण झाली आहे. आता उद्धव ठाकरेंकडे येऊ. उद्धव ठाकरे कशाच्या आधारावर आपण मुख्यमंत्री करणार आहोत असं म्हणतात. कारण त्यांना मुख्यमंत्री व्हायला फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसावा लागला आणि शरद पवारांना शरण जावं लागलं.
अगदी शरद पवार देखील स्वबळावर ठाकरेंना मुख्यमंत्री करु शकत नाहीत. पण गंमत म्हणजे मागे एकदा ठाकरे म्हणाले होते की मला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचे आहे. पण त्यांनी सामान्य शिवसैनिकाला नुसतेच बनवले आणि स्वतः त्या खुर्चीवर जाऊन बसले. तरी ठाकरेंचे मनसुबे खरे ठरले. आता त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेची महिला मुख्यमंत्री करणार असल्याची घोषणा केली आहे.
याचा अर्थ शरद पवारांसोबत मिळून पुन्हा एकदा काही योजना तर आखली नाही ना? महाराष्ट्रात असं काही घडणार आहे का, ज्यामुळे सत्तांतर घडू शकतं. कारण हे सरकार पडणार असल्याचं भाकीत अनेक लोक करत आहेत. पण कसं पडणार हे मात्र कुणी सांगत नाही. हीच खरी गंमत आहे. आता आणखी एक गंमत पहा. सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असं म्हणत ठाकरे स्वतःच अति-सामान्य शिवसैनिक झाले आणि मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले. आता महिला मुख्यमंत्री करणार म्हणजे सुषमा अंधारे वगैरे महिला नेत्या आशा लावून बसलेले असताना गुपचूप मिसेस ठाकरेंना पुढे केलं तर काय करावं? मग सुषमा अंधारे देखील एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत शिरतील काय? एकंदर कठीण आहे सगळं
Join Our WhatsApp Community