घरातील महिलांचे नाव शेतीच्या 7/12 उता-यावर असल्यास लक्ष्मी योजनेचा लाभ महिला शेतक-यांना घेता येणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे, परंतु आमचा शेतकरी बांधव हे सर्व पचवून मार्गक्रमण करत असतो, त्यामुळे शेतक-यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री दाद भुसे यांनी केले आहे.
राज्याचे प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव आयोजित करण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर त्याची सुरुवात नाशिक जिल्ह्याने सर्वप्रथम केली, हे कौतुकास्पद आहे. या महोत्सवात महिला शेतक-यांनी आवर्जून सहभाग नोंदवला असून शेतीमध्ये कुटुंबातील महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांना कृषी योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याचे धोरण शासनाने अंगीकारले आहे. त्याचबरोबर घरातील महिलांचे नाव शेतीच्या 7/12 उता-यावर असल्यास लक्ष्मी योजनेचा लाभ महिला शेतक-यांना घेता येणार आहे, असेही पालकमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.
( हेही वाचा: मुंबईत बनावट आधार, पॅन कार्ड बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! एकाला बेड्या )
काय आहे लक्ष्मी योजना ?
पतीच्या निधनानंतर शेतक-याच्या पत्नीला समाजामध्ये सन्मानाने जगता यावे यासाठी ही Lakshmi Mukti Yojana सुरु करण्यात आली आहे. शेत-यांना आपल्या पत्नीच्या नावे जमिनीची मालकी करुन देण्यासाठी एक चळवळ चालू करण्यात आलेली आहे. शेतक-यांना आपल्या पत्नीच्या नावे जमिनीची मालकी करुन देण्यासाठी एक चळवळ सुरु करण्यात आली होती, ती चळवळ शरद जोशी यांनी चालवली होती आणि त्यामध्येच शेतक-यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने जमीन करुन देण्यासंबंधीचा ठराव पारित करुन लक्ष्मी मुक्ती योजना सफल करण्यात आली.
लक्ष्मी मुक्ती योजना अर्ज कसा करायचा
जर एखाद्या शेतक-याला स्वत:च्या मर्जीने त्याच्या पत्नीच्या नावावर जमीन करायची असेल तर तसेच, त्याच्या पत्नीची नोंद सहहिस्सेदार म्हणून करायची असेल तर त्याने परिपत्रकच्या आधारे त्यांची जमीन ज्याठिकाणी आहे त्या तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो. त्यानंतर शेतक-याच्या पत्नीची नोंद ही फेरफार उता-यात केली जाईल.
Join Our WhatsApp Community