मुंबईच्या बेस्ट डबलडेकर बसला ८ डिसेंबरला ८५ वर्ष पूर्ण झाली आहेत. ८ डिसेंबर १९३७ मध्ये मुंबईत डबलडेकर बस सेवा सुरू झाली होती. बसच्या वरच्या मजल्यावरील पहिल्या सीटवर बसून प्रवासाचा आनंद देणाऱ्या लाडक्या आपल्या डबलडेकरला गुरूवारी ८५ वर्षे पूर्ण होत आहेत याच पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाकडून सुद्धा विशेष ट्वीट करण्यात आले आहे. आता या डबलडेकर बसचा कायापालट होऊन बेस्टच्या ताफ्यात लवकरच वातानुकुलित इलेक्ट्रिक डबलडेकर बस दाखल होणार आहे.
( हेही वाचा : मोदी सरकार नारी शक्ती अंतर्गत महिलांना २.२० लाख मिळणार? जाणून घ्या फॅक्ट…)
८५ वर्षांचा प्रवास
सुरूवातीला मुंबईत जागोजागी डबलडेकर बसेस प्रवाशांना सेवा देत होत्या. आजही कुर्ला ते वांद्रे स्थानकादरम्यान काही डबलडेकर बस सुरू आहेत. मुंबईकरांच्या लाडक्या डबलडेकरचा आता कायापालट होऊन प्रवाशांच्या सेवेत लक्झरी डबलडेकर बस पुढच्या वर्षी दाखल होणार आहे. बेस्ट उपक्रम मकरसंक्रांतीच्या मुहुर्तावर मुंबईकरांना ५० एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बसची सुविधा देणार आहे. बेस्टच्य ताफ्यात जानेवारीमध्ये ५० एसी डबलडेकर बस येतील त्यानंतर हळूहळू डिसेंबरपर्यंत ९०० इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात दाखल होणार आहेत. यामुळे जुन्या झालेल्या ४ डबलडेकर गाड्या २०२३ पर्यंत भंगारात काढल्या जाणार आहे. बेस्टने प्रवासी क्षमतेत वाढ करण्यासाठी, प्रदूषणमुक्त प्रवास आणि डिझेल खर्चात कपात करण्यासाठी इलेक्ट्रिक एसी डबलडेकर सेवेत आणण्याचे ठरविले आहे.
नव्या बसची वैशिष्ट्य
- प्रत्येक नव्या बसमध्ये दोन जिने असतील, जुन्या बसमध्ये फक्त एकच जिना होता.
- नव्या बसमध्ये Digital तिकीटांची सोय असेल
- प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.
- नवीन दुमजली बस भारत-६ श्रेणीतील असून या बसमध्ये स्वयंचलित गिअर आहे.
- बस थांब्याची माहिती देण्यासाठी बसमध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतील.
- दोन स्वयंचलित दरवाजे असतील आणि ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे असेल.
- प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक
Join Our WhatsApp CommunityBEST Double decker bus operation in Mumbai introduced on 8th December 1937 ,today it completes 85 years in BEST service. #bestupdates #mumbai pic.twitter.com/oT0fEL1mHG
— BEST Bus Transport (@myBESTBus) December 8, 2022