कहरच! लग्नातील मेकअप आवडला नाही म्हणून नवरीची थेट पोलिसांत धाव अन्…

163

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असताना एक अजब घटना समोर आली आहे. लग्नात नवरीला केलेला मेकअप आवडला नाही, म्हणून नवरीने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांतच तक्रार दाखल केली आहे.

(हेही वाचा – Forbes: जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत निर्मला सीतारमन; पहिल्या स्थानी कोण?)

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग असतो. त्यामुळे या दिवसाच्या आठवणी अधिक अविस्मरणीय कशा होतील यासाठी मुलासह मुलीकडचे देखील पैसा खर्च करतात. या प्रकारे लग्नाच्या दिवशी सुंदर दिसण्यासाठी वधू मुलगी ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. मात्र लग्नाचा मेकअप चांगला न झाल्याने आणि नवरीची सुंदर दिसण्याची इच्छा अपूर्ण राहिल्याने नवरीने पोलिसात ब्युटिशियनविरोधात तक्रार दाखल केली आहे. लग्नात ब्युटीशियनने केलेला मेकअप नवरीला पसंत पडला नाही म्हणून नववधूने ही तक्रार दाखल केली आहे. ही घटना मध्यप्रदेशात घडली आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एक नववधू लग्नाच्या दिवशी मेकअप करण्यासाठी एका ब्युटीपार्लरमध्ये गेली असता तिचा मेकअप ब्युटीशियनने चांगला केला नाही. नवरीचा मेकअप खराब करणं या ब्युटीशियनला चांगलंच महागात पडले आहे. नवरीने या ब्युटीशियनची तक्रार ब्युटी पार्लरच्या मालकीणीकडे केली, पण ब्युटी पार्लरच्या मालकीणीने नवरीलाच शिवीगाळ केली. यानंतर आक्रमक होऊन नववधूने ब्युटी पार्लरच्या मालकीणी विरोधातच तक्रार दाखल केली आहे.

काय घडला प्रकार

याप्रकऱणी नववधूने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये ब्युटी पार्लर मालकीणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 3 डिसेंबर रोजी एका तरुणीचा विवाह होता. या तरूणीने तिच्या मेकअपसाठी मोनिका मेकअप स्टुडिओच्या मालक असलेल्या मोनिका पाठक यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी नवरीच्या मेकअपसाठी साडेतीन हजार रुपयांचे मानधन ठरवले. यानंतर लग्नाच्या दिवशी पार्लरमधील ब्युटीशियनने नवरीचा मेकअप केला. मात्र नवरीला तो पसंत पडला नाही. याची तक्रार नववधूने ब्युटी पार्लरची मालकीण असलेल्या महिलेकडे केली. पण पार्लरच्या मालकीणीने वधूलाच जातिवाचक शिवीगाळ केली. या घटनेनंतर नववधूने ब्युटी पार्लर मालकीण महिलेविरोधात कोतवाली पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.