खरी शिवसेना कोणाची, या वादावर तोडगा काढण्यासाठी निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना प्राथमिक सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार शिवसेनेच्या उद्धव गटाने २० लाख, तर शिंदे गटाने १० लाख सदस्यांचे अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटाला पक्षाचे प्राथमिक सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे विशिष्ट स्वरूपात सादर करण्यासाठी ९ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या संदर्भात ठाकरे गटाने २० लाख प्राथमिक सदस्यांचे अर्ज आणि तीन लाख पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगासमोर सादर केली आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वतीने १०.३ लाख प्राथमिक सदस्यांचे अर्ज आणि १.८ लाख पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
(हेही वाचा पाटणमध्ये लव्ह जिहाद; वासनांध मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदू मुलीला मारहाण करत लैंगिक अत्याचार )
प्रकरण काय?
एकनाथ शिंदे यांच्यासमवेत ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंपासून वेगळी चूल मांडल्यानंतर शिंदे गटाने मूळ शिवसेनेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची, असा पेच निर्माण झाला आहे. सध्या केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी प्रलंबित आहे.
Join Our WhatsApp Community