रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकीस्वार सुरक्षित राहण्यासाठी हेल्मेटचा वापर करणं चालकांना बंधनकारक आहे. दरम्यान, दुचाकी चालकाला प्रवास करताना सुरक्षितता मिळणे आणि अपघात झाल्यास गंभीर इजा टळण्यासाठी आता दुचाकीस्वारांना एअरबॅगचे संरक्षण मिळणार आहे. जे आतापर्यंत फक्त चारचाकी वाहनांमध्ये मिळत होते ते आता दुचाकीस्वारांना देखील मिळणार आहे. इटालियन कंपनी एरोहने (AIROH) या नव्या सुरक्षा तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. या नव्या शोधामुळे दुचाकीस्वाराला अधिक सुरक्षा मिळणार आहे.
(हेही वाचा – Pension Scheme: विवाहित जोडप्याला मोदी सरकार दर महिन्याला देणार १८,५०० रुपये! पण ‘ही’ आहे अट)
इटालियन कंपनी एरोहने एअरबॅग असलेल्या हेल्मेटला एअरहेड असे नाव दिले आहे. या हेल्मेटचे वैशिष्ट्य म्हणजे अपघात झाल्यास ही एअरबॅग दुचाकीस्वाराच्या डोक्यावर इजा होण्यापासून वाचवते. या हेल्मेटचे डिझाईन अशा प्रकारे कऱण्यात आली आहे की, एअरबॅग उघडल्यावरही डोके फिरवण्यास पुरेशी जागा दुचाकीस्वाराला मिळते.
NCRB च्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये १ लाख ५५ हजार ६२२ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. मृत्यूचे हे आकडे कमी करण्यासाठी या हेल्मेटचा वापर खूप प्रभावी ठरू शकतो. त्यामुळे दुचाकी स्वाराच्या डोक्याला दुखापत होण्याची शक्यता खूपच कमी होते. या हेल्मेट सध्या तयार केले जात असून पुढील वर्षभरात ते जगभरात भारतातही विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा आहे.
Join Our WhatsApp Community