दोन दिवसांपूर्वी बेळगावच्या नजीक कन्नड रक्षण वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांची तोफतोड केली होती, त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती, हा तणाव शमत नाही तोच गुरुवारी, ८ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा कर्नाटकात महाराष्ट्राच्या वाहनांना काळे फासण्यात आले. त्यामुळे आता महाराष्ट्रात सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत.
महाराष्ट्राच्या वाहनांना काळे फासले
कर्नाटकचे समर्थन करणाऱ्या काही संघटनांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या वाहनांना अडवले आहे. त्यांनी कर्नाटकमधील गडाग जिल्ह्यात महाराष्ट्राच्या वाहनांना काळे फासले. तसेच यावेळी महाराष्ट्राच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी तर वाहनांवर चढून आंदोलन केले आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, कर्नाटकच्या या भूमिकेनंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
(हेही वाचा पाटणमध्ये लव्ह जिहाद; वासनांध मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदू मुलीला मारहाण करत लैंगिक अत्याचार )
17 डिसेंबर रोजी भव्य मोर्चा
यानंतर महाविकास आघाडीचे सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे, एनसीपीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार, आणि अन्य संघटनांचे नेते उपस्थित होते. १७ डिसेंबर रोजी महाराष्ट्रद्रोही सरकारच्या विरोधात मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी सर्व विरोधी पक्ष नेते सहभागी होणार आहेत. हा मोर्चा जिजामाता उद्यानापासून सुरु होणार असून त्याचा शेवट छत्रपती शिवाजी टर्मिनल येथे होणार आहे. सातत्याने महाराष्ट्राचा अवमान केला जात आहे, राज्याच्या कांदेकडेच्या गावांवर हक्क दाखवला जात आहे. महाराष्ट्रातून जे उद्योग पळवले आणि ते गुजरातला नेले, त्यामुळे गुजरातमध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. गुजरातप्रमाणे कर्नाटकातील निवडणूक लक्षात घेऊन महाराष्ट्रातील गावे तोडण्याची भीती वाटत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community