हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे विजयी उमेदवार ‘नजरकैदेत’

136

गुजरातमध्ये भाजपाचा एकतर्फी विजय झाला असताना दुसरीकडे मात्र हिमाचल प्रदेशामध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे, भाजपाची घौडदौड ३० च्या घरात असण्याची शक्यता आहे. मात्र एकूण ६८ विधानसभा क्षेत्र असलेल्या हिमाचल प्रदेशात बहुमताचा आकडा ३४ आहे. त्यामुळे भाजपकडून कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेस लागलीच सतर्क झाली आहे. येथील विजयी उमेदवारांना नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

कुठे कुठे नेणार आमदारांना? 

भाजपने हिमाचल प्रदेशातील पराभव स्वीकारला आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर राज्यपालांकडे राजीनामा देणार आहेत. बहुमत मिळाल्यानंतरही काँग्रेसला आमदारांच्या पळवापळवीची भीती वाटत आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्त्वाने छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि हिमाचलचे पर्यवेक्षक भूपेश बघेल यांच्याकडे येथील विजयी उमेदवारांची जबाबदारी सोपवली आहे. बघेल चंदिगढला जाणार आहेत. काँग्रेसच्या विजयी उमेदवारांना चंदिगढमध्ये येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चंदिगढमध्ये काँग्रेसच्या आमदारांची बैठक होईल. या बैठकीत पुढील रणनीती ठरेल. त्यानंतर आमदारांना राजस्थान किंवा छत्तीसगडला पाठवण्यात येणार आहे. या आमदारांना नेण्याची, त्यांना परत आणण्याची जबाबदारी हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डांना देण्यात आली आहे.

(हेही वाचा पाटणमध्ये लव्ह जिहाद; वासनांध मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदू मुलीला मारहाण करत लैंगिक अत्याचार )

काँग्रेसला का वाटते भीती? 

काँग्रेसचे जे उमेदवार निवडून आले आहेत, त्यातील काही आमदार हे भाजपचेच आहे, निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्ष बदलला होता, त्यामुळे असे आमदार नंतर भाजपाकडे जाण्याची भीती काँग्रेसला सतावत आहे. तर काही आमदारांना आमिष दाखवून भाजप आपल्याकडे वळवू शकते अशी भीती काँग्रेसला वाटत आहे, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.