महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारपासून जमावबंदी आदेश लागू झाला आहे. कोल्हापुरात 15 दिवसांसाठी जमावबंदी असेल. या काळात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. तसेच, मिरवणुका आणि सभांनाही बंदी असणार आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी गुरुवारी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
…म्हणून जमावबंदी लागू
सीमाप्रश्नावरुन महाविकास आघाडीच्या कर्नाटक सरकारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 9 डिसेंबरपासून 23 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू असतील. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोस्ट कलम (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
( हेही वाचा: उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत आझम खान यांना मुसलमानांनी ‘नाकारले’ )
राज्यातील खासदार घेणार पंतप्रधानांची भेट
महाराष्ट्रातील खासदार शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. शुक्रवारी सकाळी महाराष्ट्राचे भाजप खासदार मोदींसोबत अनेक विषयांवर चर्चा करणार आहेत. सीमावाद, राज्यपालांची वक्तव्ये यावर भाजप खासदार गा-हाणे मांडणार असल्याची माहिती आहे.
Join Our WhatsApp Community