कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात झाली आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी निर्वाणीचा इशारा दिला होता. गुरुवारी वन विभागाने कारवाई करत गडबुरुज, पायथ्यावरील दोन अतिक्रमणे जमीनदोस्त केली. पक्की बांधकामे असणा-या अतिक्रमणधारकांनी 15 दिवसांत बांधकामे काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई करु, असा सूचित इशारा उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी दिला आहे.
( हेही वाचा: फलकबाजी करताय तर सावधान; ‘हा’ मजकूर नसेल तर होणार कारवाई )
वन विभागाने कारवाई सुरु केल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. वनविभागाने गडबुरुजाजवळील शेड व पायथ्याजवळ शीतपेय दुकानच्या शेडवर कारवाई केली. पायथा परिसरात वन विभागाच्या मालकीच्या जागेत 20 हून अधिक अतिक्रमणे आहेत. नुकसान टाळण्यासाठी सर्व बांधकामे संबंधितांनी स्वत: 15 दिवसांत काढून घ्यावीत, असेही वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीत अतिक्रमण कोणत्या पद्धतीने काढावे यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. त्यावर कृती आराखडा निश्चित केला जाणार आहे.
Join Our WhatsApp Community