आता ‘आधार’वरून कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही, UIDAI ची मोठी माहिती!

165

तुम्ही आधार कार्ड धारक आहात? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. UIDAI कडून आधार कार्डबाबत एक मोठे अपडेट जारी करण्यात आले आहे. UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, आता तुम्हाला आधार क्रमांकाद्वारे सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्हाला कोणत्याही सरकारी किंवा गैर-सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट करावे लागणार आहे.

UIDAI ने ट्विट केले आहे

UIDAI ने ट्विट करून या अपडेट संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. UIDAI ने अधिकृत ट्विटमध्ये असे म्हटले की, तुम्ही तुमची POI (Proof of Identity) आणि POA (Power of Address) कागदपत्रे नेहमी अपडेट ठेवली पाहिजेत. तुम्ही POI आणि POA अपडेट न ठेवल्यास, तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या सरकारी आणि गैर-सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही POI/POA कागदपत्रे अपडेट केले नसतील आणि ते अपडेट करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला 25 रुपये ऑनलाइन आणि 50 रुपये ऑफलाइन खर्च करावे लागतील.

POI आणि POA म्हणजे काय?

‘POI’ आणि ‘POA’ म्हणजे ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा. 1 जुलै 2022 रोजी आधारद्वारे माहिती जारी करण्यात आली होती, ज्यामध्ये असे म्हटले होते, ते अपडेट करण्यासाठी, तुम्हाला एक कागदपत्र आवश्यक असेल ज्यामध्ये तुमचे नाव आणि फोटो दोन्ही असतील. ते अपडेट करण्यासाठी तुम्ही पॅन कार्ड, ई-पॅन, रेशन कार्ड, मतदार कार्ड, डीएल यांसारखी कागदपत्रे देऊ शकता. सध्याच्या काळात आधार कार्ड हे सर्वांसाठी एक महत्त्वाचे कागदपत्रं आहे, ज्याशिवाय सरकारी किंवा खाजगी कोणतेही काम करणे अशक्य आहे. आताच्या काळात तुम्ही सर्व काम ऑनलाइन अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 25 किंवा 50 रुपये खर्च करावे लागतील.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.