आतापर्यंत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना टेन्शन आल्याचं आपण ऐकलं आहे, मात्र आता शिक्षकांचं टेन्शन देखील वाढणार असल्याचं समोर आलं आहे. कारण परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांना देखील परीक्षा द्यावी लागणार आहे. हे अतिश्योक्ती वाटत असलं तरी हे खरं आहे. कारण मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षणाचा दर्जा ढासळल्यानं विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – Dream Home चं स्वप्न ‘MHADA’ करणार पूर्ण! ‘या’ दिवशी जाहिरात होणार प्रसिद्ध)
दरम्यान, प्रशासनाकडून मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात वेगवेगळ्या विषयांवर सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता शिक्षकांना देखील परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी याबाबत माहिती देताना असे सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा स्तर तपासला असता, त्याचे प्रमाण खूपच खालावल्याचे समोर आले आहे. अशातच कोरोना महामारीत शाळा पूर्णपणे बंद होत्या आणि ऑनलाईन शिक्षणाचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. शाळेत ज्यावेळी सर्वेक्षण कऱण्यात आले, त्यावेळी अनेक ठिकाणी शिक्षकांना त्यांच्याच विषयात पारंगत नसल्याचे समोर आले आहे. फार कमी शिक्षक होते की, ते त्यांच्या विषयात पारंगत होते. त्यामुळे शिक्षकांची देखील परीक्षा घेतली पाहिजे असा निर्णय घेतल्याचे केंद्रेकर म्हणाले.
अशा असणार परीक्षा
पुढे ते असेही म्हणाले की, पहिली ते दहावीच्या शिक्षकांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून संस्था आणि त्यांच्या शिक्षकांची देखील परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच या परीक्षांचा स्तर कठीण असणार असून, सर्वच शाळेत अशा परीक्षा घेतल्या जाणार असून या परीक्षेत निगेटिव्ह मार्क असणार आहे. तसेच प्रश्नांना उत्तरांचे पर्याय दिले जाणार आहे. विज्ञान, गणित आणि इंग्रजी या तीन विषयावर परीक्षा असणार आहे. मात्र परीक्षा देणे बंधनकारक नसणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community