रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुविधांमध्ये सातत्याने बदल करत असून वाढ करत आहे. प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन मोदी सरकारने एक मोठी माहिती दिली आहे. ज्यामध्ये प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन पर्यावरणाच्या सौंदर्यासाठी आणि रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यानंतर रेल्वेच्या भाड्यातही कपात होऊन रेल्वे प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे.
रेल्वे होणार इको फ्रेंडली
देशभरात प्रदूषण नियंत्रणासाठी भारतीय रेल्वे अनेक प्रयत्न करत आहे. 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठता येईल, असा विश्वास आहे. रेल्वेला पर्यावरणपूरक बनवता यावे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून रेल्वेकडून अशा अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.
रेल्वेत लवकरच होणार मोठा बदल
रेल्वेचे संपूर्ण नेटवर्क विद्युतीकरण करण्याचा प्रयत्न भारतीय रेल्वे करत आहे, ज्यामुळे प्रवाशांना भाड्यासाठी कमी पैसे खर्च करावे लागतील. विद्युतीकरणानंतर प्रवाशांना रेल्वेचा प्रवास कमी पैशात करता येणार आहे. यासोबतच रेल्वेलाही मोठा फायदा होणार आहे. सुमारे 142 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प आणि साधारण 103 मेगावॅटचे पवन ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. लोकोमोटिव्ह, कोलकाता मेट्रो रेक, इलेक्ट्रिकल मल्टीपल युनिट (EMU) ट्रेन, मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (MEMU) ट्रेन तसेच इन्सुलेटेड गेट बायपोलर ट्रान्झिस्टर (IGBT) आधारित 3-फेज सिस्टमचा वापर केला जात आहे.
(हेही वाचा – आता ‘आधार’वरून कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही, UIDAI ची मोठी माहिती!)
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, ऑगस्ट 2023 पर्यंत देशातील 75 शहरे सेमी-हाय स्पीड ट्रेनने जोडली जातील. सध्या वंदे भारत ट्रेन देशातील 5 मार्गांवर धावत असून लवकरच सहाव्या ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. देशातील सहावी वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबाद (तेलंगणा) आणि जियावाडा (आंध्र प्रदेश) स्थानकांदरम्यान चालवली जाणार आहे.
Join Our WhatsApp Community