पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाकडून PMPML ची खास विद्यार्थी सेवा सुरू केली आहे. या दोन्ही शहरातील आठ मार्गांवर सायंकाळी गर्दीच्या वेळी पीएमपीकडून ही सेवा दिली जाणार आहे. सोमवार ते शुक्रवार सार्वजनिक सुट्ट्या वगळून ही खास विद्यार्थी फेरी सुरू राहील, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
(हेही वाचा – म्हणून भागातील PMPML सेवा पुन्हा सुरू करण्याची होतेय मागणी)
या मार्गांवर PMPML सेवा सुरू
वसंत चित्रपटगृह ते धायरी मारूती मंदिर (स्वारगेट मार्गे), डेक्कन काॅर्नर ते एनडीए १० नंबर गेट, डेक्कन काॅर्नर ते कोथरूड डेपो, डेक्कन ते धनकवडी (टिळक रस्ता, स्वारगेट मार्गे), वसंत चित्रपटगृह ते कात्रज (स्वारगेट मार्गे), वसंत चित्रपटगृह ते अप्पर डेपो (स्वारगेट मार्गे), पुणे रेल्वे स्थानक ते कोंढवा खुर्द , चाफेकर चौक (चिंचवड) ते वाल्हेकरवाडी या मार्गांवरही सेवा सुरू करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या गाड्यांना सायंकाळी गर्दीच्या वेळी खास विद्यार्थी फेऱ्या असे संबोधित करण्यात येणार असून या मार्गावर प्रवास करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीच्या वाहतूक व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community