थंडीच्या मोसमात हवेचा दर्जा ढासळत असताना हवेत आता शरीराला घातक अतितीव्र सूक्ष्म धूलिकण तयार झाले आहेत. या तीव्र धूलिकणाचा माणसाच्या थेट शरीरात समावेश होत असून माणसाच्या संपूर्ण अवयवांना आता धोका पोहोचत असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली. अतीतीव्र धूलिकणांमुळे कमी वयातच माणसाचे आयुर्मान कमी होत थेट लहान वयातच विविध आजार होण्याची भीती पुण्यातील पल्मोकेअर रिसर्च एण्ड एज्युकेशन सेंटरच्य डॉ. संदीप साळवी यांनी दिली.
कित्येक वर्ष हवेचा ढासळता दर्जा
हवेच्या थरात सध्या सूक्ष्म धूलिकण म्हणून पार्टिक्युलेट पल्युटंट (पीएम) 2.5 हा सर्वात घातक समजला जात आहे. मात्र त्याला मोजण्याचे तंत्रज्ञान दहा वर्षांपूर्वी अवगत झाले. त्याअगोदर कित्येक वर्ष हवेचा ढासळत्या दर्जावर केवळ पार्टिक्युलेट पल्युटंट (पीएम) 10 (धूलिकण) हाच जबाबदार धरला जायचा. संशोधनाअंती पीएम 2.5 चीही मोजमाप करणारे तंत्र अवगत झाले. त्याच आधारावर आता पीएम 1 म्हणजेच अतीतीव्र सूक्ष्म धूलिकण मोजण्याचे तंत्र शोधायला हवे, असा मुद्दा डॉ. साळवी यांनी उपस्थित केला.
धूलिकण संपूर्ण शरीरत पोहोचतात
वाढत्या धूलिकणांचा थेट परिणाम फुफ्फुसात होतो. त्यावाटे रक्तातू तीव्र सूक्ष्म धूलिकण संपूर्ण शरीरत पोहोचतात. यामुळे विविध आजारांना माणसांना माणसाला सामोरे जावे लागते. माणसाच्या दैनंदिन कार्यक्षमतेवरही त्याचा परिणाम होतो. कित्येकदा मानसिक आजारांसाठीही हवेचा ढासळता दर्जा कारणीभूत ठरतो. माणूस बराच काळ नकारात्मक उर्जेत राहतो. श्वसनाचेही विविध आजार बळावतात. त्वचेच्या संबंधित आजारही होण्याची संभाव्यता आहे.
Join Our WhatsApp Community