शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर खोक्यावरुन निशाणा साधला आहे. खोके देऊन लोक आपल्याकडे आणले जात असतील आणि खोक्याचे राजकारण करायचे असेल तर लोकशाही संपली, असे जाहीर करा, असा टोला शिंदे गटाला लगावला आहे. जालन्यातील घनसावंगी येथील स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ शहागड संचलित संत रामदा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
अशी लोकशाही आम्ही मानणार नाही
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकशाही म्हणजे काय तर लोकांनी निवडून दिलेल्या मताची किंमत खोक्यामध्ये होत नाही. आता आपल्याकडे गु्प्त मतदान आहे. मात्र, नागरिकांनी दिलेले मत त्यांना तरी माहिती आहे का? कुणाकडे जाणार आहे आणि कुठून कुठून जाणार आहे. ट्रॅव्हल एजन्सीसारखे सुरत, गुवाहाटी आणि दिल्ली असे कधी इकडे कधी तिकडे असे मतदान मतदारांपासून गु्प्त होऊ लागले आहेत. असे कसे चालणार. अशी लोकशाही आपण मानणार नाही. त्यामुळे लोकशाहीचा अर्थ असा लावणार असाल तर देशातील लोकशाही संपली, असे एकदा जाहीर करुन टाका. तुम्ही कोणालाही मतदान केले तर त्याला आम्ही खोक्यात बसून आमच्याकडे घेऊन टाकू, अशी परिस्थिती असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
( हेही वाचा: पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘G20 अध्यक्षपद हे देशाचे सामर्थ्य दाखवण्याची एक अनोखी संधी अन्…’ )
Join Our WhatsApp Community